• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

ByEditor

Aug 13, 2023

सलीम शेख
माणगाव :
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील पाणसई आदिवासीवादी येथे फिर्यादी महिलेच्या राहत्या घरात घडली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी महिला हि घरात स्वयंपाक करीत असताना त्यांच्या घरात राहणार आरोपी याने फिर्यादी यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्यातून घरात प्रवेश करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा रजि. नं. २६२/२०२३ भादंवि कलम ३५४, ३५४अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फडताडे हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!