पाली-सुधागड । वार्ताहर
पाली शहराजवळील अंबा नदी पुलाशेजारी गुरुवारी (ता. ११) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकार्य सुरू आहे.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पँट परिधान केली होती. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही.
या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्वरित पाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी केले आहे. संपर्क क्रमांक : 02142-242223.
