• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी पूजा जगताप यांची नियुक्ती

ByEditor

Nov 22, 2025

महाड । मिलिंद माने
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी गुरुवारी महाडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी पूजा मंगेश जगताप यांना नियुक्ती केल्याचं पत्र महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या हस्ते गुरुवारी देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत (नाना) जगताप यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाड विधानसभा महिला अध्यक्षा निताभाभी शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्या अपर्णा जाधव व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते. महाड शहर महिला अध्यक्ष पदी झालेली निवड सार्थकी लावत महिलांच्या विविध प्रश्न वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पूजा जगताप यांनी बोलताना सांगितले.
   
महाड नगरपरिषदच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहचला असून पक्षाचे महिलांबाबतचे उपक्रम, ध्येयधोरणे सर्व महिला वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत या पदावर माझी नियुक्ती केल्याबद्दल खा. सुनील तटकरे, ना. आदिती तटकरे, उमाताई मुंढे, स्नेहल जगताप यांचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!