• Tue. Feb 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये मतदानाची संथ सुरुवात; पहिल्या दोन तासांत ११.०५ टक्के मतदान

ByEditor

Feb 7, 2026

​अलिबाग | प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदानाची गती काहीशी संथ असून, पहिल्या दोन तासांत म्हणजेच सकाळी ९.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११.०५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तालुकामतदान (%)तालुकामतदान (%)
पनवेल१३.००%मुरुड१०.५७%
अलिबाग१२.४३%उरण१०.४०%
कर्जत११.२४%रोहा१०.३७%
ताळा११.२४%म्हसळा९.९०%
खालापूर११.१०%पोलादपूर९.६३%
महाड११.०२%श्रीवर्धन८.८७%
पेण११.३९%माणगाव७.६८%
सुधागड१०.४९%जिल्हा एकूण११.०५%

​दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाने सर्व मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!