शाळेचे चेअरमन नरेंद्र जैन यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
किरण लाड
नागोठणे : भारत देश स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. कोएसोच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर व सरेमल प्रतापमल जैन ज्युनिअर कॉलेज नागोठणे येथील संकुलात ध्वजारोहण शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र जैन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या राष्ट्रप्रेम सोहळ्याच्या वेळी शाळा समितीचे सदस्य अनिल काळे, ऍड. सोनल जैन, जयराम पवार सर, सुभाष जैन, शाळेचे मुख्याध्यापक चिनके, आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गुरव, अमरचंद जैन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव, सोलेगावकर सर, जी. पी. पाटील सर, मेघना म्हात्रे, एनएसएस व आरएसपी पथकाचे शिक्षक भांगरे, सकाळ सत्र प्रमुख गायकवाड, दुपार सत्र प्रमुख जेडगे, शिक्षक प्रतिनिधी गावित, शिक्षकतेर प्रतिनिधी गोळे, पेटी वादक व तबला वादक श्रीमती हुले व जगताप सर, कलाशिक्षिका फड मॅडम, ढोले मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण चेअरमन नरेंद्र जैन व मान्यवरांच्या हस्ते करुन अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जाधव मॅडम यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाची प्रतिज्ञा वाचन केले तसेच मेघना म्हात्रे यांनी स्वातंत्र्य दिनाचा इतिहास सांगितला. शालेय विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत परिसरातुन रॅली काढली. मातृभूमी प्रति आतोनात प्रेमाने भरलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरगडे मॅडम यांनी केले.