• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माध्यमिक शाळा शिहू येथे स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

ByEditor

Aug 15, 2023

किरण लाड
नागोठणे :
भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन ठिकठिकाणी आज साजरा होत आहे. शिहू, ता. पेण येथील माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमाने साजरा झाला.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक केतन भोईर व सेवानिवृत्त सैनिक अमृत गदमले या मातृभूमिचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या हस्ते करण्यात आले. या आनंदाच्या आणि मातृभूमिच्या प्रेमाने भरलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या सन 2000 ते सन 2001 या कालावधीतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असलेले ऋण व्यक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन तीन स्पीच टेबल भेट देऊन शाळेप्रती असलेले आपले दायित्व निभावले.

सन 2000 ते सन 2001 बॅचच्या दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेकडून करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका उषा म्हात्रे, डाॅ. रोहिदास शेळके, के. के. कुथे, र. य. पाटील, विजय पाटील, भास्कर म्हात्रे, जनार्दन शेळके, पाटील सर, शिक्षकतेर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!