• Tue. Dec 16th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! 15 जानेवारीला मतदान, 16 तारखेला निकाल

ByEditor

Dec 15, 2025

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे.

​ही निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून, मतदानाची तारीख १५ जानेवारी २०२६ आहे आणि मतमोजणी व निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होतील. या घोषणेमुळे राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.

​या निवडणुकीत एकूण २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे, ज्यात महिलांसाठी १४४२, अनुसुचित जातीसाठी ३४१, अनुसुचित जमातीसाठी ७७ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (OBC) ७५९ जागा आरक्षित आहेत. यात मुदत संपलेल्या २७ महापालिका आणि नव्याने स्थापन झालेल्या जालना व इचलकरंजी या दोन महापालिकांचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम (Election Schedule)

मतदान पद्धतीतील फरक

​मुंबई महानगरपालिका: येथे १ सदस्यीय प्रभाग असल्याने प्रत्येक मतदाराला एक मत द्यावे लागेल.

​इतर महानगरपालिका: येथे एका प्रभागातून तीन ते पाच उमेदवार निवडून द्यावे लागतील. त्यामुळे मतदारांना तीन ते पाच मतदान करावे लागणार आहे.

​यासोबतच, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की मुदत संपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे नियोजन आहे, त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी लवकरच त्या देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!