• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, पाहा कुठे कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार?

ByEditor

Jan 22, 2026

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज (दि.22) आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलीये. महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

अखेर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय.

क्रमांकमहानगरपालिकेचे नावकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित
1बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC)सर्वसाधारण (महिला)
2ठाणे महानगर पालिकाअनुसूचित जाती (एससी)
3कल्याण डोंबिवलीअनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4नवी मुंबईसर्वसाधारण (महिला)
5वसई-विरारसर्वसाधारण
6भिवंडी-निजामपूरसर्वसाधारण (महिला)
7मीरा-भाईंदरसर्वसाधारण (महिला)
8उल्हासनगरओबीसी
9पनवेलओबीसी
10पुणेसर्वसाधारण (महिला)
11पिंपरी-चिंचवडसर्वसाधारण (महिला)
12कोल्हापूरओबीसी
13सांगली-मिरज-कुपवाडसर्वसाधारण
14सोलापूरसर्वसाधारण
15इचलकरंजीओबीसी
16नागपूरसर्वसाधारण
17अकोलाओबीसी (महिला)
18अमरावतीसर्वसाधारण
19चंद्रपूरओबीसी (महिला)
20नाशिकसर्वसाधारण (महिला)
21धुळेसर्वसाधारण (महिला)
22जळगावओबीसी (महिला)
23मालेगावसर्वसाधारण
24अहिल्यानगरओबीसी (महिला)
25छत्रपती संभाजीनगरसर्वसाधारण
26लातूरअनुसूचित जाती (महिला)
27नांदेड-वाघाळासर्वसाधारण
28जालनाअनुसूचित जाती (महिला)
29परभणीसर्वसाधारण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!