उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर चित्र स्पष्ट; आता सर्वांचे लक्ष उमेदवारी माघारीकडे
धाटाव । शशिकांत मोरे
रायगड जिल्हा परिषद आणि रोहा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बुधवारी अर्जांची छाननी पार पडली. यामध्ये ४ जिल्हा परिषद गटांसाठी दाखल झालेले सर्व ३४ अर्ज वैध ठरले आहेत, तर ८ पंचायत समिती गणांसाठी दाखल ६५ अर्जांपैकी २ अर्ज तांत्रिक कारणास्तव अवैध ठरवण्यात आले. सध्या ६३ उमेदवार पंचायत समितीसाठी पात्र ठरले असून, आता सर्वांचे लक्ष उमेदवारी माघारीच्या मुदतीकडे लागले आहे.
राजकीय गणिते आणि बंडखोरीचा ‘धमाका’
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी, महायुती किंवा स्थानिक आघाड्यांबाबत स्पष्टता नसल्याने सर्वच पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यातच भुवनेश्वर पंचायत समिती गणातून माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे समर्थक मयूर खैरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षांच्या गणितांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याठिकाणी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे (३९) गटातून सर्वसाधारण (१)जागेसाठी एकूण ७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यामध्ये रोशन पाटील(शेकाप), सुमित काते (शिवसेना),नरेंद्र मोहिते( शिवसेना), साईनाथ धुळे (मनसे), किशोर जैन (राष्ट्रवादी), कार्तिक जैन (राष्ट्रवादी), सोपान जांबेकर (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
तर रोहा पंचायत समितीच्या नागोठणे (७७) गणातून ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये कांचन माळी (शेकाप), समृद्धी कोळी (राष्ट्रवादी), रंजना माळी (अपक्ष), शिफा जुईकर (अपक्ष), नेत्रा पारंगे (राष्ट्रवादी), अंजली दुर्गावले (शिवसेना ऊबाठा), कल्याणी घाग (शिवसेना) तर सुकेळी (७८) गणातून ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये योगिता शिंदे (भारतीय जनता पार्टी), नामी हंबीर (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), गुलाब वाघमारे (शेकाप), सुषमा वाघमारे (शिवसेना उबाठा), अरुणा हंबीर (शिवसेना उबाठा) यांनी अर्ज दाखल केले होते.
आंबेवाडी (४०)गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण(१) जागेसाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये प्रतीक्षा महाबळे (शेकाप), साक्षी घावटे (शेकाप),सीमा महाबळे (शिवसेना), सुनिता महाबळे (शिवसेना), संजय पडवळ (शिवसेना उबाठा), निधी जाधव (राष्ट्रवादी) यांनी तर रोहा पंचायत समितीच्या कोलाड (७९) गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये साक्षी घावटे (शेकाप), शोभा सरफळे (शिवसेना), अनिल तवटे (अपक्ष), कल्पेश माने (अपक्ष), जगन्नाथ धनावडे (राष्ट्रवादी) यांनी तर आंबेवाडी (८०) गणातून सर्वसाधारण जागेसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये शिवराम महाबळे (शेकाप), मनोहर महाबळे (शेकाप), मारुती खांडेकर (शेकाप), संजय लोटणकर (अपक्ष), सुरेश महाबळे (शिवसेना), संजय मांडलुस्कर (राष्ट्रवादी), कुलदीप सुतार (शिवसेना उबाठा), अभिजीत गायकवाड(अपक्ष), चंद्रकांत कापसे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले होते.
राजिपच्या भुवनेश्वर (४१) गटातून सर्वसाधारण (१) जागेसाठी एकूण १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये संदेश मोरे (शिवसेना), गणेश मढवी (शेकाप), निलेश वारंगे (शिवसेना), दिनकर खरीवले (अपक्ष), दिप वाडेकर (अपक्ष), मधुकर पाटील (राष्ट्रवादी), मधुकर पाटील (राष्ट्रवादी), नितीन वारंगे (शिवसेना उबाठा), अमित पाटील (राष्ट्रवादी), देवचंद्र म्हात्रे (अपक्ष), अमित मोहिते (अपक्ष), सचिन मोरे(अपक्ष), अमित घाग (अपक्ष) तर रोहा पंचायत समितीच्या धाटाव (८१) गणातून सर्वसाधारण महिला (१) जागेसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये दर्शना खरीवले (शेकाप), स्वप्नाली मोरे (शिवसेना), विजया पाशिलकर (राष्ट्रवादी), वर्षा पाशिलकर (राष्ट्रवादी), सुप्रिया वारंगे (शिवसेना उबाठा), हर्षाली कांबळे (अपक्ष), नीलिमा मोरे (अपक्ष) यांनी तर भुवनेश्वर(८२) गणातून सर्वसाधारण (१) जागेसाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खेलू ढमाल (शेकाप), संतोष खेरेटकर (शिवसेना), वृषाल गोवर्धने (शिवसेना), सुरेश मगर (राष्ट्रवादी), महेंद्र खैरे (अपक्ष), सचिन मोरे (अपक्ष), अमित घाग (अपक्ष) या उमेदवारांनी अर्ज भरले होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या घोसाळे (४२) गटातून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (१) जागेसाठी ८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सुश्रुता पाटील (भाजपा), उर्वशी वाडकर (शिवसेना), वैष्णवी ठाकूर (शेकाप), रूपाली मढवी (शेकाप), रोहिणी सकपाळ (राष्ट्रवादी), संचिता फुलारे (शिवसेना उबाठा), नीलिमा मोरे (अपक्ष), ज्योती म्हात्रे (शिवसेना) यांनी तर रोहा पंचायत समितीच्या न्हावे (८३) गणातून सर्वसाधारण महिला (१) जागेसाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये रूपाली मढवी (शेकाप), वर्षा देशमुख (शिवसेना), प्रगती देशमुख (शिवसेना), वृषाली म्हात्रे (अपक्ष), शिवानी म्हात्रे (राष्ट्रवादी), ऐश्वर्या देवकर (राष्ट्रवादी), सुषमा देवकर(शेकाप), प्रणाली ठाकूर (अपक्ष), ज्योत्स्ना ठाकूर (अपक्ष), सिद्धीका धसाडे (भाजपा), सागरी मळेकर (शेकाप) यांनी तर घोसाळे(८४) गणातून सर्वसाधारण (१) जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये शंकर दिवकर (शेकाप), विनायक धामणे (शेकाप), मनोहर गोरे (शिवसेना), प्रणील वाडकर (शिवसेना), अतुल पाटील (अपक्ष), श्रद्धा घाग (अपक्ष), किरण मोरे (राष्ट्रवादी), दामोदर घरटकर (अपक्ष), प्रकाश धुमाळ (भाजपा), किसन मोरे (राष्ट्रवादी), गणेश भगत (अपक्ष), सचिन फुलारे (शिवसेना उबाठा), सागर फुलारे (शिवसेना उबाठा) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
एकंदरीत रोहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ गटासाठी ३४ तर पंचायत समितीच्या ८ गणासाठी ६५ उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. आज झालेल्या अर्जाची छाननी व त्यावरील हरकती प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांचे उपस्थितीत करण्यात आली. त्यामध्ये आंबेवाडी गणातील अभिजित अनंत गायकवाड व चंद्रकांत कृष्णा कापसे या अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठराविण्यात आले. यासह अन्य अर्जावर कोणतीही हरकत न आल्यामुळे उरलेले सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. अशाप्रकारे आज छाननीत जिल्हा परिषद गटासाठी ३४ अर्ज वैध ठरून पंचायत गणासाठी ६५ पैकी २ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवून ६३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. आंबेवाडी गणात होणाऱ्या चुरशीमुळे दोन उमेदवाराचे अर्ज अवैध ठरल्याने त्यांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले.
निवडणूक प्रशासनाची सज्जता
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली. कोणत्याही अर्जावर मोठी हरकत न आल्याने प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती जण माघार घेतात, यावरच प्रत्येक गटातील खऱ्या लढतीचे स्वरूप स्पष्ट होईल. तोपर्यंत ग्रामीण भागात प्रचाराच्या छुप्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
