• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोडप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह ५ जणांना अटक व सुटका

ByEditor

Aug 19, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगाव येथील चेतक इंटरप्राइझेसच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याची घटना दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची फिर्याद चेतक इंटरप्रायझेसचे सुरक्षारक्षक रमेश लक्ष्मण शेलार यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षांसह पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना शुक्रवार, दि. १८ ऑगस्ट रोजी माणगाव न्यायालयात हजर केले असता माणगाव न्यायालयाने या सर्व आरोपींची जामिनावर सुटका केली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चेतक इंटरप्राइझेस लिमिटेड सबलेट सन्नी इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कॅम्प कार्यालयामध्ये मनसे पक्षाचे ५ ते ६ कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश करून गैर कायद्याची मंडळी जमवून मोठमोठ्याने घोषणा देऊन रस्ता लवकरात लवकर करा असे ओरडुन फिर्यादी यांची वरिष्ठांची मीटिंग चालू असताना त्यांना कार्यालयाच्या बाहेर येण्यास सांगून सर्वजण बाहेर गेल्यानंतर कार्यालयामध्ये आरडाओरडा करून चार ते पाच खुर्च्यांची तोडफोड करून निघून गेले. याप्रकरणी मनसे कार्यकर्ते आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु. रजि. नं. २६७/२०२३ भादवी संहिता कलम ४४७,१४३, १४७, १४९,४२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) ,३७, (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासानंतर माणगाव पोलिसांनी या गुन्ह्याप्रकरणी मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, मनसे कार्यकर्ते संजय बाळकृष्ण गायकवाड, चिमण सुखदरे, केतन गायकवाड, दिपक जाधव या ५ जणांना अटक करून त्यांना शुक्रवारी माणगाव न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव श्री. पोंदकुळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!