उरण । घनःश्याम कडू
उरण आणि परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आता मुंबई किंवा नवी मुंबईला धाव घेण्याची गरज भासणार नाही. येथील पालवी हॉस्पिटल मध्ये नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे विविध सुपर स्पेशालिटी विभागांची ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) सुविधा सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक स्तरावरच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करून देऊन आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचे वेळापत्रक
या सुविधेअंतर्गत मूत्रपिंड, हृदयविकार, पोटविकार आणि अस्थिरोग यांसारख्या गंभीर आजारांवर खालीलप्रमाणे तज्ज्ञ उपलब्ध राहतील:
| डॉक्टरचे नाव | विभाग | वेळ / दिवस |
| डॉ. अम्मर कुलकर्णी | नेफ्रोलॉजिस्ट (मूत्रपिंड तज्ज्ञ) | दर महिन्याचा १ ला व ३ रा शनिवार (दुपारी १२ ते २) |
| डॉ. विकास भिसे | युरोलॉजिस्ट | दर महिन्याचा बुधवार (दुपारी १२ ते २) |
| डॉ. रावसाहेब राठोड | गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पोटविकार) | दर महिन्याचा २ रा बुधवार (दुपारी १२ ते २) |
| डॉ. तामरिउद्दीन धनावडे | कार्डिओलॉजिस्ट (हृदयविकार) | दर महिन्याचा २ रा गुरुवार (दुपारी १२ ते २) |
| डॉ. प्रमोद भोर | अस्थिरोग तज्ज्ञ | दर महिन्याचा १ ला सोमवार (दुपारी २ ते ४) |
| डॉ. श्रवण कुमार पवार | रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ | दर महिन्याचा २ रा व ४ था सोमवार (दुपारी २ ते ४) |
| डॉ. अरविंद जे. वाटकर | ऑर्थोपेडिक्स व स्पाइन सर्जन | दर महिन्याचा ३ रा सोमवार (दुपारी २ ते ४) |
या विशेष ओपीडी सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी आगाऊ नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी नागरिकांनी ८८५५८४५८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मेडिकव्हर हॉस्पिटल आणि पालवी हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उरणमधील भौगोलिक परिस्थिती आणि प्रवासाचा वेळ विचारात घेता, एकाच छताखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
