• Fri. Mar 6th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण पंचायत समितीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या गटनेतेपदी दीपक भोईर

ByEditor

Mar 6, 2026

उरण । घन:श्याम कडू
उरण तालुक्यातील राजकारणात ठाकरी विचारांचा झंकार पुन्हा एकदा घुमला आहे. उरण पंचायत समितीत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे करण्यात आली. या नव्या गटाच्या गटनेतेपदी दीपक भोईर यांची निवड करण्यात आली असून त्याबाबतचे अधिकृत निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

उरण तालुक्यात शिवसेनेचा भगवा अजूनही बुलंद आहे, याची प्रचिती या नोंदणीमुळे पुन्हा एकदा आली आहे. पंचायत समितीच्या राजकारणात आता ठाकरी विचारांचा आवाज अधिक बुलंद होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

या नोंदणीवेळी शिवसेनेचे मार्गदर्शक, कार्यसम्राट आणि जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी एकजुटीचे दर्शन घडवत पंचायत समितीत शिवसेनेची ताकद दाखवून दिली. यावेळी रुपेश पाटील (उपतालुका संघटक), सौ. कविता रुपेश पाटील (उरण पंचायत समिती सदस्या), परेश धनाजी ठाकूर (उरण पंचायत समिती सदस्य) आणि संदीप ठाकूर उपस्थित होते.

उरण तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक आक्रमकपणे लढा देईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पंचायत समितीत ठाकरी विचारांचे प्रतिनिधित्व आता अधिक जोरकसपणे होणार असल्याचेही सांगण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!