• Sat. Mar 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सचिन पावशे यांना पितृशोक

ByEditor

Mar 28, 2026

अलिबाग / प्रतिनिधी
अलिबागमधील पत्रकार तसेच भाजप रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप यांचे व्यवस्थापक सचिन पावशे यांचे वडील गौऱ्या विठ्ठल पावशे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी ते 87 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव येथील मच्छिमार सोसायटीचे ते माजी चेअरमन होते. वृध्दापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर शुक्रवारी (दि.27) सकाळी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. नवगावमधील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदी क्षेत्रासह मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी, सभासद, ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
त्यांचे उत्तरकार्य मंगळवार, दि. 7 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती पावशे कुटूंबियांकडून देण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!