• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रत्नागिरीतील ७ समुद्र किनाऱ्यांवर सापडले २५० किलो अमली पदार्थ

ByEditor

Aug 21, 2023

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सात समुद्र किनाऱ्यांवरुन तब्बल २५० किलोहून अधिक चरस जप्त करण्यात आलं आहे. १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरसची पाकिटं समुद्र किनारी वाहून आली. कर्डे, लाडघर, केळशी, कोलथारे, मुरुड, बुरोंडी, दाभोळ आणि बोऱ्या किनाऱ्यांवर चरसची पाकिटं सापडली. समुद्र किनारी सापडलेलं चरस अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून आलं असावं. परदेशी जहाजांमधून चरसची पाकिटं समुद्रात पडली असावीत किंवा मग ती तस्करीच्या उद्देशानं मुद्दामहून पाण्यात फेकली असावीत, असा संशय कस्टमच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दापोली कस्टम विभागाचे कर्मचारी स्वातंत्र्य दिनाच्या पू्र्वसंध्येला किनाऱ्यावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना कर्डे किनाऱ्यावर १० संशयित पाकिटं सापडली. त्यांचं वजन १२ किलो होतं. यानंतर केळशी आणि बोऱ्या किनाऱ्यांवर शोध मोहीम राबवण्यात आली.

१५ ऑगस्टला कर्डे आणि लाडघर किनाऱ्यांवर ३५ किलो चरस सापडलं. १६ ऑगस्टला केळशी किनाऱ्यावर २५ किलो, कोलथारे किनाऱ्यावर १३ किलो चरस आढळून आलं. १७ ऑगस्टला मुरुड किनारपट्टीवर १४ किलो, तर बुरोंडी किनारा ते दाभोळच्या खाडीदरम्यान १०१ किलो चरस सापडलं. बोऱ्या किनाऱ्यावर २२ किलो चरस आढळलं. यानंतर कोलथारे किनाऱ्यावरील दगडांवरही चरस सापडलं. समुद्र किनाऱ्यांवर सध्या शोध मोहीम सुरू आहे. स्थानिकांना काही संशयास्पद वस्तू, बॅग आढळल्यास त्यांनी कस्टम विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन करण्यात आल्याची माहिती दापोली कस्टम विभागाचे सहायक आयुक्त श्रीकांत कुडाळकर यांनी दिली. एखाद्या व्यक्तीकडे अमली पदार्थ सापडल्यास त्याला १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं कुडाळकर यांनी पुढे सांगितलं.

२०२२ मध्ये गुजरातच्या पोरबंदर आणि जुनागढ किनाऱ्यांवर ५६ कॉफी पाकिटं सापडली होती. प्रत्येक पाकिट १ किलोचं होतं. जुनागढमधील मंग्रोल आणि पोरबंदरमधील माधवपूरमध्ये कॉफीची पाकिटं आढळली होती. तर २०१९ मध्ये सीमा सुरक्षा दलाल गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खाडी परिसरात दोन पाकिटं सापडली होती. त्यांचं वजन २ किलो होतं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!