• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तीनपत्ती खेळण्यासाठी “तो” करायचा घरफोडी मात्र अखेर लागला पोलिसांच्या हाती

ByEditor

Aug 22, 2023

पुणे : पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यातून ११ लाखांची रोकड आणि ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी तांत्रिक विश्लेषण करीत मनीष राय याला अटक केली. तो मूळचा मध्यप्रदेशच्या कटणी येथील आहे.

चोरीस गेलेले सर्व ५५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. मात्र, चोरीस गेलेली ११ लाखांची रोकड त्याने ऑनलाइन जुगारात उडविल्याचे तपासात समोर आले आहे. मनीष जीवनलाल राय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपीला मोबाईलवर ऑनलाइन तीनपत्ती जुगार खेळण्याची सवय आहे. जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने घरफोडी केली. परंतु घरफोडीत चोरलेली ११ लाख रुपयेही तो जुगारात हारला आहे. अधिक तपास सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!