• Tue. Mar 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सोनारसिद्ध चषक क्रिकेट स्पर्धेत ‘जोगीरदेव पोस्टाची वाडी’ संघ अजिंक्य

ByEditor

Mar 31, 2026

अटीतटीच्या लढतीत सोमजाई तीसे संघावर मात; राज बिरगावले ठरला मालिकावीर

धाटाव | शशिकांत मोरे
कोलाड क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या सोनारसिद्ध धाटाव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘सोनारसिद्ध चषक’ क्रिकेट स्पर्धेचा थरार नुकताच रोहा तालुका क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणात पार पडला. दिवंगत लोकनेते भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाने अंतिम सामन्यात बाजी मारत चषकावर आपले नाव कोरले.

अंतिम फेरीत ‘जोगीरदेव पोस्टाची वाडी’ आणि ‘सोमजाई तीसे’ या दोन बलाढ्य संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या जोरदार संघर्षानंतर अखेर जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाने सरशी साधली. विजयाची मोहोर उमटताच खेळाडूंनी आणि समर्थकांनी मैदानावर एकच जल्लोष केला.

स्पर्धेतील मानकरी

स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर खालील संघांनी व खेळाडूंनी यश संपादन केले:

प्रथम क्रमांक: जोगीरदेव पोस्टाची वाडी

द्वितीय क्रमांक: सोमजाई तीसे

तृतीय क्रमांक: श्री क्षेत्र पालवी

चतुर्थ क्रमांक: श्रीराम महादेव वाडी

वैयक्तिक पारितोषिके:

मालिकावीर व सामनावीर: राज बिरगावले

उत्कृष्ट फलंदाज: प्रेम कदम

उत्कृष्ट गोलंदाज: मनिष कुचेकर

या स्पर्धेचे यशस्वी नियोजन आयोजक सतिश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र रटाटे, उमेश खैरे, नितेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शुभम मोरे, साहील जाधव, गीतेश बामुगडे, रूपेश रटाटे, प्रविण मालुसरे, भावश ठमके, रूतिक जाधव, पांडुरंग जाधव आणि चंद्रकांत रटाटे यांनी केले.

सायंकाळी उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक चषक आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे ओघवते समालोचन रोहित शेलार आणि रूपेश रटाटे यांनी करत प्रेक्षकांची मने जिंकली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!