• Thu. Apr 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्राहकांशी अरेरावी आणि काळाबाजार भोवला; उरणमधील शकुंतला भारत गॅस एजन्सीवर कारवाई

ByEditor

Apr 23, 2026
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

उरण (प्रतिनिधी) : गॅस धारकांशी अरेरावी करणे, बेकायदा गॅस सिलिंडर विकणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याने शकुंतला भारत गॅस या एजन्सीवर तालुका प्रशासनाने कारवाई केली आहे. एजन्सीला तत्काळ पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, वितरणाचा परवाना देखील रद्द करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी दिली. एकंदरीत तालुक्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.

शकुंतला भारत गॅस या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र सिलिंडर वितरण करताना राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता गँस धारकांशी अरेरावी करणे, अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलिंडर वाटप करणे.अशा अनेक तक्रारी उरण तहसील कार्यालयाकडे प्राप्त होत असत, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन उरणचे तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. या आदेशांची तातडीने तालुका पुरवठा अधिकारी गजानन देशमुख यांनी अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याच्या साठी प्रयत्न असून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनाही सदरची माहिती देऊन पनवेल येथील वांरगे बंधू यांच्या पनवेल गँस सर्व्हिसला उरण तालुक्यात घरगुती गँस सिलेंडर चे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शकुंतला भारत गॅस एजन्सी ही उरण तालुक्यातील गॅस धारकांना घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण वेळेत करत नाही तसेच सिलिंडर मध्ये हेराफेरी करत आहेत. त्यामुळे शकुंतला भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
-शिवाजी ठाकूर,
उपाध्यक्ष, आरपीआय उरण तालुका

उरण तालुक्यातील २० हजार धारकांना घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण हे शकुंतला भारत गॅस एजन्सी करत आहे. परंतु सदर एजन्सी विरोधात अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने सदर शकुंतला भारत गॅस एजन्सी विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
-डॉ. उध्दव कदम, तहसीलदार उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!