सलीम शेख
माणगाव : शहरात विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लागोपाठ विनयभंगाची दुसरी घटना घडली आहे.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील पीडित महिला या दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा.च्या सुमारास माणगाव शहरातील साईनगर परिसरात आठवडा बाजारामध्ये गेल्या असता आरोपी सनी विठ्ठल मोहिते, रा. बेलदारवाडी, माणगाव हा पीडित महिलेच्या दिशेने चालत येवुन त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला. तसेच पीडित महिला व त्यांचे पतीला मी बेलदार असून मी विठ्ठल मोहितेचा माणूस आहे. तुझे खानदानाला गोळ्या घालीन अशी धमकी दिली. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ . गुन्हा. रजि. नं २७७/ २०२३ भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ५०६ अन्वये करण्यात येऊन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड हे करीत आहेत.