• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

ByEditor

Apr 27, 2026

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्षेत्रात दि. 28 एप्रिल 2026 रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकांसाठी दि. 28 एप्रिल रोजी मतदान, तर दि. 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील वैजाळी, नागाव, खंडाळे, मुरुड – एकदरा, काशिद, मांडला, कर्जत – पाली तर्फे कोतल खलाटी, खालापूर – होराळे, माणगाव – वणी मलईकोंड, रोहा – पुई, महाड – मोहोप्रे, ताम्हाणे, वराठी, पोलादपूर – महालगुर,तुर्भे बुद्रुक, म्हसळा – घोणसे, आणि श्रीवर्धन – दिवेआगर, बागमांडला आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण 18 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!