महाड । मिलिंद माने
महाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या अक्षर संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. २२ ते २४ मे २०२६ या काळात पंढरपूर येथे हे संमेलन होणार आहे.
माझी शाळा माझा फळा या समुहातर्फे हे संमेलन आयोजित करण्यात येते.स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे आयोजित या संमेलनात राज्यभरातील सुलेखनकार, फलक लेखनकार, रांगोळीकार, चित्रकार यांचा सहभाग असेल. या निवडीबद्दल नरेंद्र महाडीक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
संयोजकांनी दाखविलेल्या विश्वासाला न्याय देत कला, साहित्य संस्कृती आणि मराठी भाषेच्या सेवेत स्वतःला समर्पित करण्याचा व ही अक्षर चळवळ अधिक गतिमान करण्याचा मी प्रयत्न करेन अशा भावना नरेंद्र महाडीक यांनी या निवडीनंतर व्यक्त केला.
अक्षरशिल्प हॅण्डरायटिंग अकॅडमीच्या माध्यमातून नरेंद्र महाडिक यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अक्षर चळवळ उभी केली असून त्या माध्यमातून १ लाख विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरांत अमूलाग्रह बदल घडवून आणला आहे. दोन वर्षा पूर्वी त्यांना ‘अक्षर गौरव’ या पुरस्काराने ३ऱ्या अक्षर संमेलन, कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले होते.
सर्व कलाकारांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करिता ही चळवळ अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
