• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विवाहाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक!

ByEditor

Aug 23, 2023

• फिर्यादीस मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी; अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
• अलिबाग तालुक्यातील मौजे वायशेत येथील घटना 

अमूलकुमार जैन
अलिबाग :
तालुक्यातील वायशेत येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अलिबाग तालुक्यातील मौज वायशेत येथे दि. 12 ऑगस्ट ते दि. 18 ऑगस्ट दरम्यान पंडित उत्तम धोतरे व फिर्यादी दोन्ही रा. परभणी यांच्यात मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतू त्यांच्या लग्नाला गावामध्ये विरोध होता म्हणून ते त्यांचे मुळ गाव दगडवाडी, ता. पुर्णा, जि. परभणी येथून अलिबाग येथे येवून मौजे वायशेत ता. अलिबाग या गावात दिनांक 12 ऑगस्टपासून आरोपी याच्या मावस भावाच्या रूमवर राहत होते. आरोपी याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी हिच्या मनाविरुद्ध शारीरीक अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी यांना लग्न करण्यास विचारणा केली असता आरोपी यांनी फिर्यादी सोबत लग्न करण्यास नकार देवून फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदरचा गुन्हा हा गंगाखेड पोलीस ठाणे जि. परभणी येथून ऑनलाईन प्राप्त झाल्याने दाखल करण्यात आला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क.376,376 (2),(N), 323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे म्हात्रे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!