• Wed. May 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्याजवळ भीषण अपघात; ट्रेलरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा अंत

ByEditor

May 13, 2026

नागोठणे | महेंद्र म्हात्रे
मुंबई-गोवा महामार्गावर कानसई गावच्या हद्दीत ट्रेलर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य दोन युवक जखमी झाले असून, अपघात घडवून ट्रेलर चालक फरार झाला आहे.

मंगळवारी (१२ मे) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुकेळी येथील जिंदाल वर्कर कॉलनीत राहणारे राजनाथ बैजनाथ राय (२०), भार्गव घोष (२५) आणि सचिनकुमार राय (१९) हे तिघे मोटारसायकलने नागोठणे येथून सुकेळीच्या दिशेने जात होते. कानसई बस स्टॉप जवळ आले असता, समोरून येणाऱ्या एका ट्रेलर चालकाने दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून ट्रेलर वेगाने वळवला आणि दुचाकीला जोराची धडक दिली.

अपघातात राजनाथ बैजनाथ राय (वय २०) गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर भार्गव घोष आणि सचिनकुमार राय हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर ट्रेलर चालकाने मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस फरार चालकाचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!