किरण लाड
नागोठणे : माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला असुन नागोठण्यातील शाळांमध्ये दहावीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मुलींनीच पटकावला आहे.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत मुला-मुलींचे पास होण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. नागोठण्यातील होली एंजल स्कुल तसेच भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. होली एंजल स्कुलची कु. सुजल रोहीदास हातनोलकर ही विद्यार्थिनी 93 टक्के गुण मिळवुन शाळेत प्रथम आली. कु. अक्षया किरण पत्की ही 91.80 टक्के गुण मिळवुन व्दितीय, तर कु. पेरिकाविल अॅरन जाॅन हि 91.20 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कुलची कु. आर्या अवधूत लिमये ही विद्यार्थ्यांनी 87 टक्के गुण मिळवुन शाळेत प्रथम आली. कु. हनिया शकील हकीम ही विद्यार्थ्यांनी 85.40 गुण मिळवुन द्वितीय आली तर, कु. रीतुल राजेश श्रीवास्तव ही विद्यार्थिनी 82.80% टक्के गुण मिळवुन शाळेत तृतीय आली आहे.
गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर नागोठणे हायस्कुलचा दहावीचा निकाल 95.20 टक्के लागला आहे. या शाळेतील कु. सृष्टी दत्ता श्रीवर्धनकर ही विद्यार्थिनी 92 टक्के गुण मिळवुन शाळेत प्रथम आली तर कु. ब्रिजेश शिवनरेश मोर्या हा विद्यार्थी 89 टक्के गुण मिळवुन शाळेत द्वितीय आला तर, कु. श्रावणी योगेंद्र चौलकर ही विद्यार्थिनी 88 टक्के गुण मिळवुन वर्गात तृतीय आली आहे.
एकंदरीत पाहता यंदा दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान मुलींनीच पटकावलेला दिसुन येत आहे. दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शाळा कमिटीचे चेअरमन तसेच शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.