• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी मयुर शिर्के यांची निवड

ByEditor

Aug 24, 2023

किरण लाड
नागोठणे :
येथील सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंगरआळीच्या अध्यक्षपदी मयुर शिर्के यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाचे यंदा 28वे वर्षे आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिटिंग आंगरआळी येथील श्री हनुमान मंदिरात दि. 22 आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांच्या तसेच गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या वार्षिक मिटिंगमध्ये धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मयुर किसन शिर्के यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी ओंमकार संजय पिंपळे, कार्याध्यक्षपदी पांडुरंग सोनू कामथे, सेक्रेटरी दिपक साधुराम पडवळकर, खजिनदार वैभव शंकर जाधव, सहसेक्रेटरी योगेश बाळाराम पवार, सह-खजिनदार कल्पेश अनिल चांदविणकर अशी सन 2023 ते सन 2024 सालाकरिता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. मागील कमिटीने केलेल्या जमाखर्चाचा हिशोब वाचुन मंजुर करण्यात आला. तसेच मागील कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार ग्रामस्थ तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नागोठणे विभागात नावाजलेले मंडळ आहे. मंडळाचे यंदा 28वे वर्षे आहे. आकर्षक सामाजिक देखावा, तसेच ग्रामस्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस मंडळाचे अध्यक्ष मयुर शिर्के यांनी बोलुन दाखविला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!