• Sun. May 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; महाड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

ByEditor

May 31, 2026

​महाड | मिलिंद माने
लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजेब मुसा जुवेल (रा. अप्पर तुडील, महाड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी (३० मे) रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवला.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १२ मे २०२६ या कालावधीत अप्पर तुडील येथील पीडितेच्या माहेरी ही घटना घडली. आरोपी शहाजेब जुवेल याने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासवून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यास भाग पाडून आरोपीने तिच्याशी घरात व टेरेसवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

​फसवणूक आणि अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने महाड तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध ​भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ६४(२)(एम), ६९, ३५१(२), ​भारतीय दंड संहिता (IPC) १८६० कलम ३७६(२)(एन), ३७६(क) आणि ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

​पुढील तपास: या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करीत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!