• Thu. Jun 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उत्तुंगतेज यंग सायंटिस्ट स्पर्धा परीक्षेत रोह्यातील विद्यार्थ्याचे राज्यात ८वे स्थान

ByEditor

Jun 11, 2026

धाटाव । शशिकांत मोरे
रोहा येथील एमडीएन इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ५ वीचा विद्यार्थी विहान अजित तेलंगे याने उत्तुंगतेज यंग सायंटिस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात ८ वे स्थान मिळविले आहे.विहानने १५० पैकी १२३ गुण मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याची राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थी (National Level Achiever) म्हणून निवड झाली आहे. तसेच त्याला इस्रो (ISRO) व आयआयटी (IIT) शैक्षणिक भेट कार्यक्रम २०२६ साठीही निवडण्यात आले आहे.

विहानच्या या यशाबद्दल कोलाड विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप तटकरे, सचिव प्रकाश सरकले, रजिस्ट्रार अजित तेलंगे, एमडीएन इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर, प्राचार्या योगिनी देशमुख तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व वैज्ञानिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विज्ञान विषयातील आवड,सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर विहानने मिळविलेल्या या यशामुळे शाळा,पालक आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात तो विज्ञान क्षेत्रात आणखी मोठी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.त्याने मिळविलेल्या यशाचे सर्वच स्तरातून अभिनंदन करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!