श्रीवर्धन | अनिकेत मोहीत
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, याच परिसरातील अनियंत्रित वाढलेल्या आणि सुकलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी उभारण्यात आलेले आकर्षक पादचारी मार्ग, विद्युत खांब (लाईट पोल) आणि पर्यटकांसाठीची बाकडी यांना या धोकादायक फांद्यांचा थेट विळखा पडला आहे.
संभाव्य अपघाताची भीती
किनाऱ्यालगत असलेल्या अनेक झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून, त्या पादचारी मार्गावर आणि विद्युत वाहिन्यांच्या दिशेने झुकल्या आहेत. आगामी पावसाळ्यात वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे या फांद्या कधीही तुटून पडण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास पादचारी मार्ग व विद्युत खांबांचे मोठे नुकसान तर होईलच, सोबतीने किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
“श्रीवर्धन किनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. पावसाळा तोंडावर असल्याने नगरपरिषदेने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी आणि पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करावी.”
— स्थानिक नागरिक, श्रीवर्धन
नगरपरिषदेने तातडीने पावले उचलण्याची गरज
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेने संबंधित परिसराची तातडीने पाहणी करून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या
