• Sat. Jul 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव–दिघी मार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक, तरुणाचा मृत्यू

ByEditor

Jul 11, 2026

सलीम शेख
माणगाव  :
दिघी मार्गावर निळगुण गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला भरधाव ॲक्टिवा दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. 
       
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, शनिवार दि. ११ जुलै दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मोर्बा येथून माणगावच्या दिशेने येत असलेली ॲक्टिवा क्र. एमएच ०६ सीबी ८५२८ निळगुण गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला क्र. एमएच ४६ एफ ४४६८ पाठीमागून जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की ॲक्टिवावरील मोहतसिम धनसे, (वय २०, रा. मोर्बा) याचा मृत्यू झाला. तर सूफियान बंदरकर (वय १९, रा. मोर्बा) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले व त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!