• Fri. Jul 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड तालुका मनसे अध्यक्षपदी मंगेश शिंदे, शहराध्यक्षपदी पंकज उमासरे तर सचिवपदी अमोल दळवी

ByEditor

Jul 17, 2026

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नियुक्त्या जाहीर

महाड । मिलिंद माने
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड तालुका अध्यक्षपदी मंगेश शिंदे यांची, तर शहराध्यक्षपदी पंकज उमासरे व तालुका सचिवपदी अमोल दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नवीन नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली.

दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्षपदी राज पार्टे यांची नियुक्ती झाल्यानंतर, पक्ष संघटने बळकटीकरणासाठी आणि आगामी काळात पक्ष वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महाड तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी मंगेश शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, तर महाड शहराध्यक्षपदी पंकज उमासरे यांची पक्षाकडून फेरनियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत तालुका सचिव म्हणून अमोल दळवी यांची नव्याने निवड करण्यात आली आहे.

मुंबई येथील मनसेच्या ‘राजगड’ मध्यवर्ती कार्यालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीपत्रांचे अधिकृत वाटप करण्यात आले. या नव्या नियुक्त्यांमुळे महाड आणि संपूर्ण रायगड परिसरात मनसेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पक्षाची ताकद वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!