मिलिंद माने
महाड : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारू भरून त्याला नव संजीवनी देण्याचा प्रयत्न चालू असून कागदोपत्री पाणीटंचाई दूर झाल्याचे दिसेल मात्र महिलांच्या डोक्यावरील हंडा काही उतरणार नसल्याचे चित्र चालू वर्षी मार्च महिन्यापासून बघावयास मिळणार आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या एकेका ठेकेदाराला कमीत कमी 20 ते 25 योजनांची कामे मिळाली असून त्याच्याजवळ ही सर्व कामे एकाच वेळी चालू करण्यास लागणारे तांत्रिक यंत्रसामग्री तसेच अपेक्षित मनुष्यबळ नसल्याने मूळ ठेकेदाराने अनेक उप ठेकेदारांना कामे वाटून त्यांच्याकडून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, उप ठेकेदारालाही पाणीपुरवठा योजनांच्या कामाचा कोणताही पूर्व अनुभव नसल्याने अनेक गावातील नळ पाणी योजनेची कामे तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाची झालेली आहेत.
महाड तालुक्यात अनेक गावातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेमधील कामांमध्ये सन 2020-21 मध्ये किंवा त्या अगोदर मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल सारख्या पूर्वीच्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या साठवण टाक्या, पंप हाऊस, जॅकवेल तसेच जुन्या पाईपलाईन दाखवून ही कामे अनेक गावांमध्ये केली गेली आहेत.
महाड तालुक्यातील ज्या गावातील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच गावातील सरपंच अथवा पक्षाच्या तालुका प्रतिनिधीने केली असून यापैकी एकालाही नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा पूर्व अनुभव नाही आहे. परिणामी ही कामे करताना अनेक योजनांच्या कामांमध्ये तांत्रिक चुका झाल्या आहेत.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना देखील कोणत्याही प्रकारचा तांत्रिक अनुभव नसल्याने नवीन पाणी योजना होऊन देखील अनेक गावात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्या गेल्या मात्र त्यावर यथोचित तोडगा न काढता व त्यातील तांत्रिक चुका न काढता त्या चुका तशाच ठेवल्याने अनेक गावात भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाद होण्याची चिन्हे आहेत. तर काही गावांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचे पाण्याचे उद्भव चुकीच्या ठिकाणी घेतल्याने मार्चनंतर त्यातील पाणी स्त्रोत्र गायब होऊन पुन्हा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे चालू असताना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने व उपविभागीय अभियंत्यांनी किती वेळा व कधीही प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसून पाणी योजनांचे अंदाजपत्रक बनविल्याने अनेक गावात या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण होणार असून भविष्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या पाणी योजना या कागदोपत्री पूर्ण झाल्याच्या दिसतील मात्र महिलांच्या डोक्यावरील हंडा मात्र जैसे थे राहिल्याचे चित्र सन 2024 च्या मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये पाहावयास मिळणार आहे.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची नावे ठेकेदाराचे नाव व अंदाजीत रक्कम
नळ पाणीपुरवठा योजना | अंदाजीत रक्कम | ठेकेदाराचे नाव |
गवाडी नळ पाणीपुरवठा योजना | 22,47,609/- | गजराई कन्स्ट्रक्शन, प्रोप्रायटर – दीपक महानोरे (साईनगर पोस्ट माणगाव) |
वसाप नळ पाणीपुरवठा योजना | 42,91,946/- | सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनी, प्रोप्रायटर – गणी बाबासाहेब धामणकर (मु. पो. पोलादपूर) |
उगवत कोण नळ पाणीपुरवठा योजना | 95,49,063/- | सह्याद्री कंट्रक्शन कंपनी, प्रोप्रायटर – गणी बाबासाहेब धामणकर (मु. पो. पोलादपूर) |
भेलोशी नळ पाणीपुरवठा योजना | 43,87,229/- | विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – अभय महामुनकर (मु. लक्ष्मी अपार्टमेंट मारुती नाका अलिबाग) |
कुरले नळ पाणीपुरवठा योजना | 1,27,89,586/- | लौकिक संजय शिंदे (मु. पो. मंगरूळ ता. महाड) |
चोचींदे नळ पाणीपुरवठा योजना | 1,07,08,437/- | टीडी इंटरप्राईजेस प्रोप्रायटर – तनवीर अन्वर देशमुख (लोअर तुडील तालुका महाड) |
वाळसुरे नळ पाणीपुरवठा योजना | 1,00,4063/- | अमर संजय जाधव (मु. मालेगाव ता. बारामती) |
पिंपळवाडी नळ पाणीपुरवठा योजना | 88,44,800/- | लौकिक संजय शिंदे (मु. पो. मंगरूळ ता. महाड) |
काळीज नळ पाणीपुरवठा योजना | 94,91,113/- | अमर संजय जाधव (मु. मालेगाव ता. बारामती) |
मुळशी नळ पाणीपुरवठा योजना | 1,47,91,983/- | आर. एम. कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – मझहर देशमुख (मु. नडगाव ता. महाड) |
कोजर नळ पाणीपुरवठा योजना | 2,10,86,97/- | सोहम कंट्रक्शन प्रोप्रायटर – संजय नारायण तांडेल (मु. कासारभट पो. साई ता. पनवेल) |
वाघोली नळ पाणीपुरवठा योजना | 77,22,643/- | देविदास संभाजी चव्हाण (मु. साबाई नगर ता. खालापूर) |
रामदास पठार नळ पाणीपुरवठा योजना | 1,11,76,436/- | समर्थ कृपा कन्स्ट्रक्शन कंपनी (सांडवे तालुका महाड) |
शिरवली नळ पाणीपुरवठा योजना | 1,82,37,091/- | हाय टेक इन्स्प्रास्ट्रक्चर (मु. २९१ कसबा पेठ शॉप नंबर पाच जि. पुणे) |
कावळे तर्फे विनहरे नळ पाणीपुरवठा योजना | 1,00,70,0938/- | हाय टेक इन्स्ट्रक्चर (मु. २९१ कसबा पेठ शॉप नंबर 5 जि. पुणे) |
कोठेरी नळ पाणीपुरवठा योजना | 1,78,61,237/- | श्री शेल शंकराप्पा आजगी (मु. शिव समर्थ नगर सरेकर आळी, महाड) |
केतकीचा कोंड नळ पाणीपुरवठा योजना | 53,19,424/- | सतीश सुधाकर घरत (मु. पो. थळ, ता. अलिबाग) |
मोहपरे नळ पाणीपुरवठा योजना | 1,1085,479/- | आर. एम. कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – मजहर देशमुख (मु. नडगाव ता. महाड) |
दादली नळ पाणीपुरवठा योजना | 86,78,338/- | आदेश अनंत तुढीलकर (मु. पो. पोलादपूर) |
करंजखोल नळ पाणीपुरवठा योजना | 1,75,61,970/- | आर. एम. कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – मझहर देशमुख (मु. पो. नडगाव ता. महाड) |
नेराव नळ पाणीपुरवठा योजना | 1,37,93,662/- | गजराई कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – दीपक महानुरे (मु. साईनगर ता. माणगाव) |
पांगारी नळ पाणीपुरवठा योजना | 1,060,47 97/- | गजराई कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – दीपक महानुरे (मु. साईनगर ता. माणगाव) |
नांदगाव बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजना | 95,17,382/- | गजराई कंट्रक्शन प्रोप्रायटर – दीपक महानुरे (मु. साईनगर ता. माणगाव) |
बारसगाव नळ पाणी पुरवठा योजना | 97,33,510/- | शिरीष विलास कमाने (मु. पो. मजगाव ता. मुरुड जि. रायगड) |
कोळसे नळ पाणीपुरवठा योजना | 2,38 42,965/- | देविदास संभाजी चव्हाण (मु. साबाई नगर ता. खालापूर) |
सादोशी नळ पाणीपुरवठा योजना | 71,25,730/- | विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – अभय महामुनकर (मु. लक्ष्मी अपार्टमेंट मारुती नाका अलिबाग) |
निगडे नळ पाणीपुरवठा योजना | 1,9946,111/- | राज इंटरप्राईजेस प्रोप्रायटर – विजय साळुंखे (मु. सारळ ता. अलिबाग) |
धुरूप कोंड नळ पाणीपुरवठा योजना | 46,22,602/- | लौकिक संजय शिंदे (मु. पो. मंगरूळ ता. महाड) |
कांबळे तर्फे बिरवाडी नळ पाणी पुरवठा योजना | 1,45 12,777/- | ऋतुजा श्रीकृष्ण घोडके (मु. सुपेपुर पो. मांजरसुबा ता. बीड) |
गावडी नळ पाणीपुरवठा योजना | 39,62,444/- | श्री समर्थ कृपा कंस्ट्रक्शन (मु. चाडवे ता. महाड) |
दापोली नळ पाणीपुरवठा योजना | 84,17,421/- | वीरेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी – अमेय घोलप (मु. पो. समतानगर ता. महाड) |
निजामपूर नळ पाणीपुरवठा योजना | 74 17,022/- | साई कंट्रक्शन प्रोप्रायटर – अभिजीत विठोबा म्हात्रे (मु. आमंत्रण बिल्डिंग प्लॉट नंबर 203 गोदावरी नगर पेण) |
पारवाडी नळ पाणीपुरवठा योजना | 1,44,33,356/- | प्रतीक परशुराम शिंदे (मु. पो. कोळकेवाडी पायरवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी) |
आसनपोई नळ पाणी पुरवठा योजना | 92,96,610/- | एमडी इन्फ्रास्टक्चर (मु. बी-8, वेट रेसिडेन्सी भांगरवाडी लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) |
आकले नळ पाणीपुरवठा योजना | 58,91,393/- | आर. एम. कंट्रक्शन प्रोप्रायटर – मझहर देशमुख (मु. नडगाव पो. महाड) |
पारमाची नळ पाणीपुरवठा योजना | 1,64,95,020/- | आर. एम. कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर – मझहर देशमुख (मु. नडगाव ता. महाड) |
वाकी बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजना | 2,69,33,586/- | राज इंटरप्राईजेस प्रोप्रायटर – विजय साळुंखे (मु. सारळ ता. अलिबाग) |
वाकी खुर्द नळ पाणीपुरवठा योजना | 47,27,214/- | तेजस सुभाष निकम (मु. बोरगाव पो. मोहोत, ता. महाड) |
पिंपळकोंड नळ पाणीपुरवठा योजना | 66,97,555/- | सह्याद्री कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर गणी बाबासाहेब धामणकर (मु. पो. पोलादपूर) |
मोहोत नळ पाणीपुरवठा योजना | 5,23,65,261/- | संदीप निवृत्ती सावंत (मु. पो. फुलेवाडी, ता. कोल्हापूर) |
साकडी नळ पाणीपुरवठा योजना | 88,14,904/- | शिरीष विलास कमाने (मु. पो. मजगाव, ता. मुरुड) |
गोठवली नळ पाणीपुरवठा योजना | 41,83,160/- | करण किशोर पाटील (मु. पो. मातोश्री निवास शिवाजीनगर ता. माणगाव) |
गांधार पाले नळ पाणीपुरवठा योजना | 2,53,55,476/- | श्रीशैल शंकराप्पा आजगी (मु. शिवसमर्थ नगर सरेकर आळी ता. महाड) |
महाड तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे व त्यांची कामे प्रत्यक्षात चालू आहेत त्या योजनांच्या ठिकाणी पूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनांमधून कामे झाली होती व त्यातील काही कामांचा देखभाल दुरुस्ती अवधी संबंधित ठेकेदाराकडे असतानाही त्याच योजनांवरती जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे दाखवून व काही ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत देखील योजना झालेल्या आहेत व त्या चालू स्थितीत होत्या अशा योजनांवर सोपस्कार पार पाडण्याचे उद्योग पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाबरोबरच रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने करून व कोणत्याही योजनांच्या निविदा तालुका अथवा जिल्हा वृत्तपत्रात न देता व त्यावरील हरकती सूचना विचारात न घेता या योजनांची कामे चालू केल्याने भविष्यात या योजना सुस्थितीत चालू राहण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात पडण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र सन 2024 च्या मार्च व एप्रिल महिन्यात निवडणुकीच्या काळात पाहण्यास मिळणार आहे. |