अमूलकुमार जैन
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आक्षी समुद्र किनारी अमली पदार्थाचे ६ पाकिटे सापडले असून त्याचे वजन ६.८३३ किलो इतके आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील आक्षी गावच्या समुद्र किनारी मिळून आलेली प्लास्टिक पिशवीची पाकिटे त्यावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरुडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्या बाजूला इंग्रजीमध्ये AFGHAN PRODUCT असे लिहिलेले दिसत होते. सदर पाकिटावर उर्दू लिपीमध्ये छापील अक्षरे असलेली तसेच वरील प्लास्टिकचे आवरणाच्या आत नक्षीदार प्लास्टिक आवरण असलेले व सदर पाकिटावर इंग्रजीमध्ये LIMITED EDITION व STARBUCKS HOLIDAY BLEND असे लिहिलेली एकूण नऊ प्लास्टिकची पाकिटे व काही फाटलेल्या पाकिटमधून बाहेर येऊन तुकडे पडून वाळूमध्ये पसरलेला हिरवट काळसर रंगाचा पदार्थ असा ६.८३३ कि.ग्रॅ. वजनाचे सहा पाकिटे मिळून आली आहेत.