• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

ByEditor

Aug 31, 2023

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातील मांडले गावातील धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला आहे. एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक जण वाचला मात्र दोघांना आपला जीव गमवावा लागला.

महाड तालुक्यातील हिरकणी वाडी गावातील पाच महाविद्यालयीन तरुण धबधब्यावर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी तालुक्यातील मांडले गावात असलेल्या धबधब्यावर आज सकाळी गेले होते. धबधब्यातील पाण्यात पोहत असताना दुपारी यातील सचिन रामचंद्र औकिरकर, रोहित पांडुरंग औकिरकर यांना डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यातील एकाने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो देखील धबधब्याच्या पाण्यात बुड लागल्याने सोबतच्या दोघांनी त्याला बाहेर काढला. मात्र यामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

मांडले येथील धबधब्यावर गेलेल्या या तरुणांचे अंदाजे वय 16 ते 17 वर्षाचे असून महाडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घरच्यांना समजतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

महाड तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बुडालेल्या दोघांचे मृतदेह रेस्क्यू टीमच्या सहाय्याने काढण्यात यश मिळवले. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पावसाळी पर्यटनात धबधब्यांवर बंदी असताना देखील तरुण तरुणाई आतताईपणा करत असल्याने अशा घटना घडत आहेत. मात्र, बेसावधपणे पावसाळी पर्यटन करणारी तरुणाईं मात्र यातून कोणताही बोध घेत नसल्याचे या घटनेवरून सिद्ध होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!