विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन गोपाळ केणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, सचिवपदी दत्तात्रेय अनंत म्हात्रे तर उपाध्यक्ष म्हणून दिनेश नामदेव पवार यांची निवड ५ जून २०२३ रोजी उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीचे पत्रकार संघाच्यावतीने पुष्पगुछ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य मधुकर ठाकूर, प्रदीप पाटील, जगदीश तांडेल, सूर्यकांत म्हात्रे, अनंत नारंगीकर, राजकुमार भगत, महेश भोईर व सुभाष कडू उपस्थित होते.