डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; लाठी-काठी व भालाफेकमध्ये चमकदार कामगिरी
विनायक पाटील
पेण : मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या वतीने चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पेण येथील डॉ. पतंगराव कदम आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. बी.ए. भाग-१ मध्ये शिकणाऱ्या कु. अंतरा नामदेव पाटील हिने लाठी-काठी स्पर्धेत सुवर्णपदक आणि भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या व पेण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दुहेरी यशाने पेणचे नाव उंचावले
चेंबूर येथे पार पडलेल्या या पारंपरिक व मैदानी क्रीडा स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये कु. अंतरा पाटील हिने अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी करत लाठी-काठी या पारंपरिक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. याशिवाय भालाफेक स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत तिने द्वितीय क्रमांक म्हणजेच रौप्यपदक (Silver Medal) मिळवून दुहेरी यश संपादन केले.
शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा क्षेत्रातही चमक दाखवावी : प्राचार्य डॉ. वाघ
अंतराच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
“विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही आवडीने सहभागी होऊन उत्तम कामगिरी करावी आणि महाविद्यालय व परिसराचे नाव उंचावावे.”
— डॉ. मुरलीधर वाघ, प्राचार्य
या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयात अंतरा पाटील हिचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रा. संतोष गुरव (जिमखाना विभाग प्रमुख), डॉ. बाळासाहेब सरगर (जिमखाना सदस्य), डॉ. श्रीकांत महादाने (IQAC समन्वयक), डॉ. राजेंद्र शिंगटे (भूगोल विभाग प्रमुख), प्रियांका काळोखे (कार्यालयीन अधीक्षक) यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी कु. अंतरा हिच्या कौशल्याचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीस उदंड शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेविषयची माहिती पूर्णपणे चुकीची दिली आहे