• Tue. Aug 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिष्यवृत्ती परीक्षेत नागोठण्याच्या मोक्ष भांगरेचे सुवर्णयश; रायगड जिल्ह्यात पटकावला पाचवा क्रमांक!

ByEditor

Aug 11, 2026

कोएसो कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक

नागोठणे । महेंद्र म्हात्रे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता चौथी) नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कु. मोक्ष कमल भरत भांगरे याने रायगड जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

मोक्षने एकूण ३०० गुणांपैकी २५६ गुण (८५.३३%) मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्रता सिद्ध केली आहे. त्याने पेपर-१ (प्रथम भाषा व गणित) मध्ये १२४ गुण आणि पेपर-२ (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी) मध्ये १३२ गुण मिळवत हे घवघवीत यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल नागोठणे परिसरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

मोक्षच्या या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा लोखंडे, वर्गशिक्षक राहुल भवर, शिक्षिका राजश्री जाधव आणि विजया पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्याच्या या उत्तुंग यशाबद्दल तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष अनिल काळे, सदस्य जयराम पवार, सुभाष जैन यांच्यासह शाळा व्यवस्थापन, शिक्षक वर्ग आणि पालकांनी मोक्षचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!