• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे येथील वसंत भोसले यांचे निधन

ByEditor

Sep 11, 2023

किरण लाड
नागोठणे :
येथील केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ वसंत सहादेव भोसले यांचे वयाच्या 75व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले आहे.

कै. वसंत भोसले अतिशय शांत, सयंमी स्वभावाचे होते. मुंबई येथे नोकरी करुन आपल्या कुटुंबाचे चांगल्या प्रकारे संगोपन केले आहे. उंच, मजबूत शरीरयष्टीचे भोसले हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाजातही लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबाबरोबर मराठाआळी ग्रामस्थांवरही शोककला पसरलेली आहे. त्यांच्या अंत्यविधीस केएमजी विभागातील ग्रामस्थ, नातेवाईक, विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन विवाहित मुले सुधीर व अशोक तसेच दोन विवाहित मुली जना व अश्विनी, जावई, नातवंडे, पुतणे तसेच चुलते असा मोठा भोसले परिवार मागे आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार, दि.18 सप्टेंबर रोजी तसेच उत्तरकार्य (बारावा) गुरुवार, दि. 21 सप्टेंबर 2023 रोजी नागोठणे मराठाआळी येथील राहत्या घरी होणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!