• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई, पुणे व कोकण विद्यापीठाच्या कुलगुरुंची नियुक्ती

ByEditor

Jun 7, 2023

किरण लाड
रायगड :
मुंबई, पुणे तसेच कोकण विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्तीची घोषणा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, कुलपती रमेश बैस यांनी केली आहे.

डाॅ. रविंद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी, डाॅ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर डाॅ. संजय भावे यांची डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आलेली आहे. या सर्व कुलगुरूंची निवड महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. डाॅ.रविंद्र कुलकर्णी हे इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. तर डाॅ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. डाॅ. संजय भावे हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बाॅटनी विभागाचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!