सलीम शेख
माणगाव : लोधीवली-खालापूर येथे रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा दि. १२ व १३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत माणगाव तालुक्याचे व देशपांडे चेस ॲकॅडमी, गोरेगाव-रायगड यांचे वर्चस्व दिसून आले.
या स्पर्धेमध्ये मुलांमधून १४ वर्षाच्या गटात कु. सर्वेश गांगरे, कु. काशीफ म्हाळुणकर, कु. कृष्णा बनकर, कु. वेदांत मेथा, कु. हरिओम शहा यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. तसेच १७ वर्षाच्या गटात कु. चंदन जंगम, परम झा, गंधार माळी, विनीत प्रसाद, तेजस जगदाळे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला.

मुलींमधून १४ वर्षाच्या गटात कु. अपेक्षा मार्बल, कु. अलिषा शेख, कु. आर्या जाधव, कु. भार्गवी नायडू, कु. आर्या पानसरे यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. १७ वर्षाच्या गटात कु. पूर्वा पवार, कु. ऋतुजा नेटक, कु. जिया ठाकूर, कु. शीफा शेख, कु. प्रिया पवार यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक प्राप्त केला. या सर्व स्पर्धकांची निवड ही मुंबई विभाग स्तरावर होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाली आहे. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे तसेच नंदकुमार पालवे यांनी सर्व खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.
