रायगड जनोदय ऑनलाइन: आवळा (Amla Benefits) हे एक असे फळ आहे जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध, आवळा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. शिवाय त्वचेची काळजी, केसांची निगा राखण्यासाठी देखील वापरला जातो. (Amla Benefits)
तुम्ही आवळ्याचे सेवन अनेक प्रकारे करू शकता जसे की जाम, आवळा कँडी, आवळा पावडर आणि आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचे पाणी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आवळा पाणी बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे (Health benefits of Amla water) जाणून घेऊया.
पोटाच्या समस्या दूर होतात
सकाळी आवळा पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन यापासून आराम मिळतो. गॅस, आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो. त्यामुळे दररोज त्याचे सेवन करू शकता.
रक्तशुद्धी, पिंपल्स, चहेरा चमकतो
हे रक्त शुद्ध करते आणि विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे चेहऱ्यावर चमक येते, पिंपल्स आणि डागांची समस्याही दूर होते.
केसाच्या समस्या
रोज आवळ्याच्या पाण्याचे सेवन केल्यास केस गळणे, कोंडा होण्याची समस्या दूर होते. (Amla Benefits)
वजन कमी होते
आवळा पाणी रोज प्यायल्यास मेटाबॉलिज्म गतिमान होण्यास मदत होते. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते आणि जास्त कॅलरीज बर्न होतात. हे वजन कमी करण्यास मदत करते.
दृष्टी सुधारते
आवळ्यात व्हिटॅमिन ए, सी भरपूर असल्याने तो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो. आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.