• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बाप्पाला

ByEditor

Sep 17, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू असून मंगळवार (दि. १९) पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी हळूहळू गर्दी वाढत आहे. त्यातच रविवारी (दि. १७) सुट्टीच्या दिवशी गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भक्त बाजारात आले आहेत. याच गर्दीत दुचाकीवरून गणेशमूर्ती नेणाऱ्या भक्तांनाही शहरातील वाहतूक कोंडीचा फटका बसू लागला आहे.

गणेशोत्सवात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्याची जबाबदारी उरण नगरपरिषद व उरण वाहतूक विभागाची असतानाही ती होताना उरण शहरात दिसत नसल्याने कोंडीत अधिकची भर पडली आहे. उरण शहरातील रस्ते हे अरुंद आहेत. अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर परिघाच्या कक्षेत वसलेल्या या शहरात वाहनतळाचा अभाव आहे. त्याचप्रमाणे दिवसागणिक वाढणारे फेरीवाले आणि वाढती वाहनांची संख्या यांचीही भर पडत आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी बेशिस्त वाहन पार्किंग या वाहनांवर न होणारी कारवाई या सर्व समस्यांमुळे कोंडीत अधिकची वाढ झाली आहे. त्यामुळे उरण नगरपरिषद व उरण वाहतूक विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवून किमान उत्सवाच्या काळात तरी शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!