• सर्वे गावातील शिंदे गटातील मुस्लिम कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल
• भरडखोल, जीवना जेट्टीसाठी मंजूर असलेला निधी आमच्याच प्रयत्नाने -सुनील तटकरे
• आदर्श सांसद गावातील ६० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण
अभय पाटील
बोर्ली पंचतन : सागरी महामार्ग आपल्या भागातून जाणार आहे यासाठी योग्यतो पाठपुरावा करताना महाविकास आघाडीच्या सरकारने 10 हजार कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे, तर येत्या काळाध्ये आपण सत्तेत येणारच असा विश्वास व्यक्त करताना भरडखोल, जीवना बंदरातील जेट्टीसाठी एकूण सुमारे 337 कोटी रुपयाचा निधी मंजुरीसाठी आपण पाठपुरावा केल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणाले. भरडखोल येथे सत्कार समारंभ तर वडवली आदर्श सांसद गावातील विविध विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

आदर्श सांसद ग्राम योजनेतून दत्तक घेण्यात आलेले श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील नागरी सेवा योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या सुमारे रुपये 60 लक्ष निधीच्या विकासकामाचे रायगड खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात येणार आले यामध्ये श्री गावदेवी मंदिर ते शंकर आळी रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी सोलर पॅनल व सोलर दिवाबत्ती, वरचा मोहल्ला डांबरीकरण रस्त्याचे, निरंकारी भवन ते पाण्याची टाकी डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन, संतोष भायदे ते निरंकारी भवन डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच भरडखोल येथे कोळी समाजाच्या नौका मालक यांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महमद मेमन, श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष सूचिन किर, मंदार तोडणकर, वडवली सरपंच प्रियांका नाक्ती, उपसरपंच सुरेश धुमाळ, आगरी समाज अध्यक्ष किशोर बिराडी, भंडारी समाज अध्यक्ष सदानंद खेउर, मुस्लिम समाज अध्यक्ष रिझवान चिविलकर, बबन सुर्वे, , बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर, सुजित पाटील, संतोष भायदे, विजय पांडव, ल सु भाये, मोतीराम परबळकर, भंडारी समाज महिलाध्यक्ष भक्ती मांजरेकर तसेच भरडखोल येथील रामचंद्र वाघे, नामदेव पावशे, कृष्णा चोगले, जीवना पर्सनेट अध्यक्ष मोहन वाघे, हरिभाऊ वाघे, तुकाराम वाघे, लक्ष्मण भोईनकर, नारायण खोपटकर, गणेश पाटील आणि इतर उपस्थित होते.

यावेळी आपल्या मनोगतामध्ये खासदार सुनील तटकरे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच जीवना बंदर विकासासाठी 204 कोटी तर भरडखोल बंदर विकासासाठी 132 कोटी निधी मंजूर केला आहे यासाठी आदिती तटकरे या विभागाची आमदार व मी स्वतः खासदार म्हणून दिल्ली मध्ये मत्स्यविभागाकडे या कामाचा पाठपुरावा केला आणि याचे श्रेय जर कोणी अन्य घेत असतील तर त्यांनी समोर यावं व तुम्ही कोणाला भेटून यानिधी मंजुरीचा पाठपुरावा केला ते नावासह सांगावं ते खरं निघालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन असे आव्हान दिले. तर बॅरिस्टर अंतुले यांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे सागरी महामार्गाची पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी देखील महाविकास आघाडी सरकारने त्याची तरतूद केली आहे. हे सांगताना येत्या काही कालावधीमध्ये आपण सत्तेमध्ये असणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
सर्वे येथील शिंदे गटातील मुस्लिम कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी सर्वे येथील काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्ते यांनी नाराज होत बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटा मध्ये प्रवेश केला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धन मतदार संघ अध्यक्ष महमद मेमन तालुका उपाध्यक्ष सूचिन किर यांच्या मध्यस्थीने गैरसमज दूर होऊन त्या कार्यकर्त्यांनी पुनश्च शिंदे गट शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यामध्ये बशीर चोगले, इस्माईल चोगले, तौशिफ चोगले, किफायत चोगले, सिराज चोगले, निसार चोगले, अब्दुल दळवी, शहबाज दळवी, साबीर मुकादम, इस्माईल गंगरेकर, खालिद रईस व इतर यांनी प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे खासदार सुनील तटकरे यांनी पक्षामध्ये स्वागत केले. |