• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाच टनाखालील वाहतुकीसाठी साळाव पूल उद्यापासून खुला!

ByEditor

Jun 10, 2023

संतोष रांजणकर
मुरूड :
रोहा, अलिबाग व रोहा या तीन तालुक्याला जोडणारा दुवा असलेल्या साळाव पूलाच्या दुरुस्तीत तीन दिवस सुरू असलेले लोड टेस्टिंगचे काम पूर्ण झाले असून आदेशानुसार रविवार, दि. ११ जून सकाळी ६ वा. पासून पाच टनाखालील वाहतूकीसाठी पूल खुला करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

साळाव पूलाच्या दुरुस्तीच्या कामात दि. ८ ते १० जून या तीन दिवस लोड टेस्टिंगसाठी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर प्रवासी व नागरिकांना पायी चालत जाण्याची मुभा देण्यात आली होती. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आल्याने याचा पर्यटन व्यवसाय व स्थानिक बाजार पेठेवर परिणाम दिसून आला. उद्या सकाळपासून हा पूल पाच टनाखालील वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने टू-व्हीलर, थ्रि-व्हीलर व फोर व्हीलर वाहने पुलावरून ये-जा करण्यास मार्ग खुला झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार अवजड वाहने, एसटी. सेवा लवकरच सुरू केली जाईल अशी अपेक्षा नागरिक व प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!