किरण लाड
नागोठणे : कानडा राजाला, विठु माऊलीला भेटण्यासाठी प्रत्येक वारकरी, भक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो, तो क्षण म्हणजे आषाढी एकादशी! या दिवशी पंढरपूरात चंद्रभागेच्या तीरी, वाळवंटी लाखो वारकरी, भक्त विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले असतात.
आषाढी वारी म्हणजेच पंढरपूरची वारी या वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणतात आयुष्यात जन्माला आल्यावर एकदा तरी पंढरपूराची वारी करावी, या वारीमध्ये महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरुन आलेल्या पालख्या, त्यामध्ये टाळ, मृदुंगासह वाजत, गाजत, नाचत सहभागी झालेले वारकरी, विठुरायाचे भक्त हा सोहळा बघण्यासारखा असतो. विशेष करुन महाराष्ट्रातुन गेली अनेक वर्षे दोन महान संताच्या पालख्या आषाढी वारीसाठी पंढरपूरकरींता प्रस्थान करीत असतात. त्याप्रमुख संतांच्या पालख्यांचा आषाढी वारीचा वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
प्रस्थान दि. 11 जुन, 2023 आळंदी येथुन
दि.12 जुन भवानी पेठ
13 जुन पुणे
14,15 जुन सासवड,
16 जुन जेजुरी
17 जुन वाल्हे
18,19 जुन लोणंद
20 जुन तरडगांव
21 जुन विमानतळ फलटण
22 जुन बरड
23 जुन नातेपुते
24 जुन माळशिरस
25 जुन वेळापुर
26 जुन भंडीशेगाव
27 जुन वाखरी
28 जुन पंढरपूर
29 जुन आषाढी एकादशी
अशा वेळापत्रकानुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रंगणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक
11 जुन देहू येथुन पालखीचे प्रस्थान
12 जुन आकुर्डी
13 व 14 जुन पुणे
15 जुन लोणी काळभोर
16 जुन यवत
17 जुन वरखंड
18 जुन उंडवडी
19 जुन बारामती
20 जुन सणसर
21 जुन आंधुर्णे
22 जुन निमगाव केतकी
23 जुन इंदापूर
24 जुन सराटी
25 जुन अकलूज
26 जुन बोरगाव
27 जुन पिराची कुरोली
28 जुन वाखरी
29 जुन पंढरपूर
अशाप्रकारे संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारीचा पालखी सोहळा रंगणार आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. टाळांच्या गजरात, नाचत, गाजत रात्रंदिवस विठु नामांचा गजर करीत देहभान हरपून वारकरी पालख्यांबरोबर पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात. यावेळी काही प्रमुख ठिकाणी पालखी थांबुन भरणारा रिंगण सोहळा बघण्यासारखा असतो. प्रमुख संताच्या पालख्या पंढरपूरातून 3 जुलैला माघारी परतणार आहेत.