• Thu. Apr 17th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेनेच्या ‘होऊ दे चर्चा’ अभियानाला उरण शहरात उदंड प्रतिसाद

ByEditor

Oct 9, 2023

माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

विठ्ठल ममताबादे
उरण :
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बोल घेवड्या घोषणांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’ हा अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जात आहे, याचाच एक भाग म्हणून शिवसेना उरण शहराच्या वतीने मोरा, भवरा, मुस्लिम मोहला व शहर शाखा येथे रविवार, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी हे अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, मा. नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेविका ॲड. वर्षा पाठारे, सोशल मीडियाचे समन्वयक नितीन ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बोलघेवड्यांच्या योजनांचा पर्दाफाश केला. यामध्ये गॅसचे दर, पेट्रोल, डिझेलचे दर, महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले दर, बेकारी, स्थानिक आमदारांचे सर्व पातळीवरील अपयश, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नामांतराचा प्रश्न व सरकारने केलेल्या फसव्या घोषणांचा आपल्या मनोगतातून पर्दाफाश केला.

सदर वेळी उरण शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहर संघटक दिलीप रहालकर, उपशहरप्रमुख कैलास पाटील, अरविंद पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, निलेश भोईर, माजी शहर संघटक महेश वर्तक, महिला आघाडीच्या तालुका संघटिका (शहर) सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका वंदना पवार, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, उपशहर संघटिका रझिया शेख, माधुरी चव्हाण, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष मुमताज भाटकर, तालुकाध्यक्ष हुसेना शेख, तालुका उपाध्यक्ष रुबिना कुट्टी, उपाध्यक्ष सायरा खान, शाखा संघटिका कविता गाडे, लोळगे मॅडम, हसीमा सरदार, रुकसाना सय्यद, विभागप्रमुख अश्विन गवस, ग्राहक संरक्षण कक्षेचे शहर संघटक संदीप जाधव, शाखाप्रमुख विकी म्हात्रे, राकेश कोळी, अजय म्हात्रे, इस्माईल शेख, कफील फसाटे, फतेह खान, सहीम शेख, शाहरुख गडी, प्रदीप शेळके, संतोष पाटील, रुपेंद्र गुडेकर, दर्शन जळगावकर, संदेश पाटील, हेमंत कोळी, प्रशांत कोळी, नंदू कोळी, माळी, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, युवासेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!