अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील मेटपाडा येथे येथे संगीता पेरेकर (वय 50 वर्षे) यांची लाखों रुपयांची फसवणूक गुजरात राज्यातील जाफराबाद येथील समीर (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 13/11/2023 रोजी 07:00 वा ते दि. 16/11/2023 रोजी 07:00 वा.दरम्यान मौजे मेटपाडा अलिबाग फोनद्वारे आरोपीताने मोबाईल नंबर 9260967061 वरुन महिला फिर्यादी संगीता पेरेकर (रा.मेटपाडा, अलिबाग, ता.अलिबाग) यांचा मोबाईल नं.9158716838 वर फोन करुन मी तुम्हाला कमी रेटने मच्छि देतो असे सांगून मच्छिचे फोटो पाठवून त्याचा व्यवहार व त्याने फोटोमध्ये पाठविलेली मच्छि फिर्यादीला पसंत पडल्याने फिर्यादी यांनी आरोपीला एकुण 2,80,000/- रुपयांची सुक्या मच्छिची ऑडर दिली असता सुक्या मच्छिचा माल पाठवतो असे सांगून गुगल पे व फोन पे द्वारे रुषीराज नावाच्या इसमाचा खाते नं. 923010020526457 वर पैसे पाठविवण्यास सांगून फिर्यादी सदर खात्यावर अगाउ रक्कम 2,00,000/- रुपये पाठविवले असता सुक्या मच्छिचा माल न पाठवता तसेच पैसे परत न करता फिर्यादी यांची फसवणुक केली.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 289/2023 भा.दं.वि.क. 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार सोनकर हे करीत आहेत.
