विनायक पाटील
पेण : शहरामध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दयावे. त्या अनुषंगाने दर महिन्यात किमान एकदा स्वच्छता अभियान घेण्यात यावेत, असे निदेश जिल्हधिकारी, रायगड-अलिबाग यांनी दिले असून त्यानुसार दि.२४/११/२०२३ रोजी शहरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियान घेवून रस्त्याचे सौंदर्यकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पेण नगरपरिषदेचे मुख्य प्रवेशव्दारापासून धरमतर रोड येथे स्वच्छता अभियानास सुरूवात करण्यात आली. सदर अभियाना अंतर्गत रस्त्यालगत असलेली गटारे स्वच्छ करण्यात आली, तसेच दुभाजक लगत साठलेली माती काढून दूभाजक स्वच्छ करण्यात आले. अतिरीक्त वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. विद्युत पोल सुस्थितीत करण्यात आले. रस्ता रुंदीकरणामध्ये व्यवसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा औषध फवारणी करण्यात आली. रस्त्यालगतची गटारांची माती उचलण्यात आली, तसेच जेसीबीच्या मदतीने सपाटीकरण करण्यात आले. सदर अभियानात मुख्याधिकारी जिवन पाटील, मनोज पाटील, सुहास कांबळे, शिवाजी चव्हाण, अंकिता इसाळ, रेश्मा करबले, निकिता पाटील,महेश वडके, गोविद भिसे, उमंग कदम, प्रशांत ढवळे, भरत निवरे, किशोर जाधव, गौतम मोरे, व इतर कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, पत्रकार बंधू उपस्थित होते.
स्वच्छता अभियानकरीता १ जेसीबी, १ ट्रॅक्टर व पेण नगरपरिषदेचे ६० कायम व कंत्राटी सफाई कामगारांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आले. सदर अभियान पेण नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी व नागरीक असे एकूण १३० जणांच्या मदतीने यशस्वी करण्यात आले. अभियानादरम्यान ०.८० कि.मी. रस्ता स्वच्छ करण्यात आला व १ ते २ टन कचरा गोळा करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आंबेगाव येथे वाहतूक करण्यात आला.
