शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे कालवा रोड नजिक १३ नोव्हेंबर रोजी ५ किलोच्या सिलेंडरचा घरामध्ये स्फोट झाल्याने या स्फोटात मनोहर घोसाळकर यांच्यासह अन्य दोघेजण जखमी झाल्याचे समोर आले होते. मुंबई येथे उपचार घेत असताना नुकताच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. यापाठोपाठ आज अखेर १३ दिवसानंतर मनोहर अंबाजी घोसाळकर यांची मृत्यूशी झुंज देत असताना प्राणज्योत मालवली.
आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या घोसाळकर कुटुंबावर आज काळाने पुन्हा एकदा घाला घातला. आज सकाळी ७ वाजता मनोहर अंबाजी घोसाळकर (वय ६२) यांचेही उपचारादरम्यान निधन झाल्याने घोसाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या धक्कादायक निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला.
