अनंत नारंगीकर
उरण : चिर्ले येथील एका एम .टी कंटेनर यार्ड मध्ये एकाच वेळी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थे च्या माध्यमातून दोन अजगरांची सुटका करण्यात आली. एकाची लांबी अंदाजे ९ फुट आणि दुसऱ्याची लांबी साडे आठ फुट आहे. हे अजगर मिलन करण्यासाठी एकत्र आले असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चिर्ले येथिल कंटेनर यार्ड मध्ये हे अजगर असल्याचे यार्डचे सुपरवायझर कुणाल पाटील यांनी वन्यजीव निसर्ग संरक्षणे संस्थेचे सदस्य सदस्य नितीन मढवी,साहिल घरत यांना कळविले.त्यानंतर संस्थे सर्प मित्र तातडीने पोहचले आणि दोन्ही अजगरांना सुरक्षित केले. त्यानंतर त्यांना पकडून त्याची माहिती वनविभागाचे अधिकारी संतोष इंगोले यांना दिली. दोन्ही अजगरांना बुधवार, दि. २९ रोजी एकाच ठिकाणी दुधेला डोंगर चिर्ले येथे वनधिकारी यांच्या समक्ष सोडण्यात आले. या आधी सुद्धा चिर्ले गावा लगत असणारे छोटे छोटे कंटेनर यार्ड मध्ये अजगर सारखा मोठा साप निघाल्याच्या घटना घडलेल्या दिसून आल्या आहेत.
