• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुरुड तालुक्यातील मिठागर येथे तलावामध्ये शॉक लागून इसमाचा मृत्यू

ByEditor

Jun 19, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
मुरूड तालुक्यातील मिठागर येथे मच्छि तलावामध्ये पाणी चालू बंद करण्याचा कॉक बंद करण्यासाठी गेलेला इसम बुलाई धुलापाडा मुड्डी (वय २७ वर्षे, रा. चुपरीजिला, जयनगर पश्चिम बंगाल) मयत झाला असल्याची फिर्याद मुरूड पोलीस ठाणे येथे मनोज विश्वनाथ खेतान (वय 53 वर्षे रा.- ३०२ श्री गणेश अगण, सीएचएसली समता नगर, ठाकूर सिनेमा समोर, मुंबई ४००१०१) यांनी दिली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मुरूड पासून अंदाजे पंधरा किलो मीटर अंतरावर असणारे मिठागर या ठिकाणी मच्छि तलाव आहे. या तलावामध्ये पाणी बंद चालू करण्यासाठी असलेला कॉक बंद करण्यासाठी बुलाई धुलापाडा मुड्डी हा गेला असता त्यास इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यास अधिक औषध उपचारसाठी मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याची कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
याबाबत मुरूड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!