`एक दिवस कायस्थांचा’ सोहळा रंगला एकविरा गडावर
अलिबाग : कार्ला येथील एकविरा गड परिसरात सीकेपी समाजाची वास्तू उभारण्याचा निर्धार कार्ला गडावर झालेला `एक दिवस कायस्थांचा’ सोहळ्यात करण्यात आला.
गेली काही वर्षे कार्ला येथील एकविरा गडावर एक दिवस कायस्थांचा' सोहळा साजरा केला जातो. यंदा मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील चार संस्था एकत्र येवूनएक दिवस कायस्थांचा’ सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. एक दिवस कायस्थांचा' पहाटे देवीच्या अभिषेकापासून विविध कार्यक्रम पार पडले. त्यात प्रामुख्याने अभिषेक, काकड आरती, देवीची पालखी, होमहवन, गोंधळ, महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकविरा मंदिर परिसरात सर्वच जमातींच्या वास्तू आहेत. सीकेपी समाजाची देवता असूनही ज्ञातीची वास्तू नसल्याने वास्तू उभारण्याचा संकल्प यावर्षी सोडण्यात आला. यासाठी जागा पाहण्याचे ठरले. तसेच पुढील वर्षीपासूनएक दिवस कायस्थांचा’ विश्वस्त संस्था तयार करुन त्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस एकविरा गडावर भक्तांची वाढती गर्दी असते. एक दिवस कायस्थांचा' सोहळ्यात सुरुवातीची काही वर्षे सोहळ्यासाठी येणार्या ज्ञातीबांधवांना वेगळी रांग असे. परंतु आता मात्रएक दिवस कायस्थांचा’ येवूनही देवीचे दर्शन मिळत नाही. अशा अनेक तक्रारी असल्याने ज्ञातीतर्फे घेण्यात येणार्या जागेत मंदिर उभारावे अशीही मागणी होत आहे.
यंदा प्रथमच नवीन कार्यकर्त्यांतर्फे उत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी महाप्रसादासाठी स्वप्नील प्रधान यांनी योगदान दिले. तसेच उत्सवाच्या यशस्वीतेसाठी विकास देशमुख, अशोक कुळकर्णी, जयदिप कोरडे, मिलिंद मथुरे, भूषण देशपांडे, निलेश गुुप्ते, मंदार कुळकर्णी, पुष्कर गुप्ते, माणिक गडकरी, सागरिका कर्णिक, गौरी मथुरे इत्यांदींनी मेहनत घेतली.
